

हिंजवडी : कासारसाई येथे मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या खासगी 'डॉग केअर सेंटर' त्वरित हटवण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. येथील भरत कोडींबा टेमगिरे यांच्या मालकीची खासगी जागा आहे. 'मेक न्यू लाईफ डॉग फार्म' या संस्थेला डॉग फार्मसाठी भाडेतत्वावर दिली आहे. ही जागा दाट लोकवस्तीमध्ये आहे. तेथील असणार्या कुत्र्यांच्या भुकण्याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. तसेच, येथील कुत्र्यांच्या विष्ठेचा खूप भयंकर वास येतो. तेथे उपचारासाठी आणलेले बरेच कुत्रे पिसाळलेलेही असतात.
या ठिकणी व्यवस्थित नियोजन नसल्याने तेथील कुत्रे दवाखाण्याच्या बाहेर येतात. त्याने शेजारील राहणार्या लोकवस्तील लहान मुलांना जीवितास धोका होण्याची दाट शक्यता आहे. जनावरांना ही धोका निर्माण झाला आहे. तरी मेक न्यू लाईफ डॉग फार्म असल्याल्या ठिकाणावरून त्याचे दुसरीकडे स्थलातर करावे, त्यापासून होणार्या त्रासापासून तेथे अस्तिवात असलेल्या लोकवस्तीची सुटका करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. हनुमत दशरथ बावकर, समीर बावकर, अनिकेत बावकर, रामचंद्र बावकर, सत्यवान शिखरे यांनी याबाबत मागणी केली आहे.
कासारसाई येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात या डॉग केअर सेंटरचा त्रास होत आहे. कुत्र्यांचे भुंकणे, लहान मुलांनादेखील यामुळे भीती वाटत आहे. भीतीयुक्त वातावरणामुळे लहान मुले खेळू शकत नाहीत. त्यामुळे हे सेंटर लवकरात लवकर येथील लोकवस्तीतून स्थलांतर करावे.
– तुषार बावकर, स्थानिक नागरिकमेक न्यू लाईफ डॉग फार्म ही संस्था मान्यताप्राप्त संस्था आहे. एनजीओच्या माध्यमातून ही संस्था कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री आणि खासगी श्वान यांची देखभाल येथे केली जाते. ग्रामस्थांना या डॉग केअर सेंटरमुळे त्रास होत असल्याची तक्रार असेल तर भविष्यात येथील सेंटर स्थलांतरित करण्याबाबात विचार करीत आहोत.
– डॉ. सुवर्णा पसारे, संचालिका, मेक न्यू डॉग