आंग्रे घराण्याची ३०० वर्षांची प्राचीन ज्येष्ठा गौरी पूजनाची परंपरा | पुढारी

आंग्रे घराण्याची ३०० वर्षांची प्राचीन ज्येष्ठा गौरी पूजनाची परंपरा

अलिबाग : जयंत धुळप

ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरी आहेत. मात्र मराठा आरमाराचे प्रमुख दर्यासारंग सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या घराण्यात मात्र जेष्ठा गौरींचे आगमन आणि पूजन होते. आंग्रे घराण्याची ही 300 वर्षांची प्राचीन परंपरा असून जेष्ठा गौरी पूजनाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या आठव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे.

रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकोट किल्ल्या जवळील घेरीया या निवासस्थानी रविवारी भाद्रपद शुद्ध शष्ठीला परंपरेनुसार ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले. आंग्रे घराण्याची प्रथा आणि परंपरा अजही तशीच सुरु असून. त्या परंपरेनुसार चालत आलेल्या सरखेल कोन्होजीराजे यांच्या काळातील देवीचा मुखवटा गेल्या आठ पिढ्यांपासून आजही असल्याचे रघुजीराजे आंग्रे यांनी पूढे सांगितले.

आंग्रे घराण्याचीसोमवारी भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या दिवशी रघुजीराजे आंग्रे व त्यांच्या सुविद्यपत्नी भैरवी आंग्रे यांनी गौरींचे परंपरेनुसार विधीवत पूजन केले. अत्यंत आकर्षक अशी आरास देखील गौरीपुजनाच्या निमीत्ताने करण्यात आली आहे.

आपल्या रिती आणि परंपरा आपण आवर्जून पाळल्या पाहीजेत. जेणेकरुन त्या आपल्या पुढील पिढीला समजतील आणि त्यांच्या पिढीत देखील त्या पाळल्या जाऊन पिढीजात परंपरा अखंडीत पूढे सुरु राहातील. या हेतूने आंग्रे घराण्याच्या सर्व पिढ्यांपिढ्याच्या रिती, परंपरा आणि सण आम्ही साजरे करित आहोत, असेही रघुजीराजे आंग्रे यांनी आवर्जून सांगीतले.

Back to top button