रायगड : द्रोणागिरी नोड येथे दरोडेखोरांच्या टोळीतील तिघे जेरबंद | पुढारी

रायगड : द्रोणागिरी नोड येथे दरोडेखोरांच्या टोळीतील तिघे जेरबंद

उरण; पुढारी वृत्तसेवा : सिडकोतर्फे नव्याने विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोड मधील एम-गोल्ड ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानावर सशस्र दरोड्याचा प्रयत्न २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आला होता. मात्र मालकाच्या आणि महिला कामगाराच्या प्रसंगावधानानंतर दरोडेखोर पळून गेले होते. या दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी नागरिकांतून होत होती. अखेर उरण पोलिसांनी 15 दिवसानंतर तीन दरोडेखोरांना अटक केली आहे. तर दोन फरार आहेत.

अटक आणि फरार आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. अंकुश अश्रुबा जाधव, (वय 44,   रा. संघर्षनगर, साकीनाका, 2) बिलाल अब्दुल करीम चैधरी (वय 19, रा. उल्हासनगर ) शंकर बनारसी चैरासिया (वय 51, रा. वडाळा (पूर्व) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तएजाज अब्दुल करीम चौधरी आणि अशिष उर्फ सुरज जिलेंदर सिंग हे फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर बनारसी चौरसिया हा पहिल्यांदा दुकानामध्ये पिस्तूल घेवून शिरला होता. त्याने दुकानातील महिला कर्मचाऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावले होते. मालकाने धोक्याचा सायरन वाजवल्यानंतर आणि त्या महिला कर्मचाऱ्याने विरोध केल्यानंतर हा दरोडेखोर आणि त्याचे साथीदार पळून गेले होते.

यातील अंकुश जाधव याच्यावर मुंबई, नवीमुंबई आणि ठाणे येथे 29 गुन्हे दाखल आहेत. एजाज अब्दुल करीम चैधरी याच्यावर मुंबई, नवी मुंबई, ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत तसेच गुजरात येथे असे एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. आशिष उर्फ सुरज जिलेंदर सिंग याच्यावर मुंबई, नवी मुंबई, ठाणे या पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे.  तपास सुरू असल्याचे उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button