Raigad News: रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २१ धरणे शंभर टक्के भरली

Raigad  News: रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २१ धरणे शंभर टक्के भरली

रोहे : रायगड जिल्ह्यातील २८ धरणांपैकी २१ धरणे १०० टक्के भरली आहेत. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर दुसरीकडे ७ धरणे १०० टक्के भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यातील ४ धरणांत ९४ टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याने ही धरणेही लवकरच भरण्याची शक्यता आहे. उर्वरित ३ धरणांत ७५ टक्केपेक्षा कमी पाण्यासाठा उपलब्ध आहे. अद्याप पाऊस पडत असल्याने ज्या धरणात कमी पाणीसाठा आहे. ती धरणे पूर्ण क्षमतेने भरतील, असे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी २०२२ ला २८ धरणांमध्ये ९६.५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर यावर्षी २८ धरणांमध्ये ९६.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. (Raigad News)

रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त पाऊस ३०१२ मिमी झाला आहे. तर गेल्या वर्षी २७०० मीमी पाऊस झाला होता. आंबेघर, श्रींगाव, कार्ले, रानीवली, बामणोली, उसरण, पुनाडे ही धरणे १०० टक्के भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, गाढी, सावित्री या नद्या ओसांडून वाहत आहेत.

Raigad News : रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यातील २८ धरण क्षेत्रातील पाणीसाठा असा

मुरुड तालुक्यातील फणसाड धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्रात ९४ टक्के पाणीसाठा, अलिबाग तालुक्यातील श्रींगाव धरणक्षेत्रात ९८ टक्के पाणीसाठा, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), घोटवडे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), ढोकशेत धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), कवेळे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), उन्हेरे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात ७५ टक्के पाणीसाठा, कुडकी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), रानीवाली धरणक्षेत्रात ७३ टक्के पाणीसाठा, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), संदेरी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), महाड तालुक्यातील वरंध धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), खिंडवाडी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), कोर्थुडे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), खैरे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), अवसरे धरण क्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), खालापूर तालुक्यातील भिलवले धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), कलोते मोकाशी धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरू), डोणवत धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात १०० टक्के पाणीसाठा (विसर्ग सुरु), बामणोली धरणक्षेत्रात ९७ टक्के पाणीसाठा, उसरण धरणक्षेत्रात ९८ टक्के पाणीसाठा, उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात ७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news