मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यात एसटीला आग | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्यात एसटीला आग

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य स्टेट ट्रान्सपोर्ट एसटी महामंडळाची महाड आगारातील मुंबई – फौजी अंबावडे एसटी बस क्रमांक एम एच 14 बी टी 20 65 आज (शुक्रवार) सकाळी नऊच्या सुमारास पनवेलकडून पेणच्या दिशेने जात होती. यावेळी कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत आल्यानंतर एसटी बसला आग लागली. या आगीत बस खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या बस मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कर्नाळा अभयारण्य हद्दीतून जात असताना गाडीच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे बस चालक महादेव नाटकर यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ कंडक्टरना सांगून बसमधील 52 प्रवाशांना बाहेर उतरविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे सामान व बस पूर्णतः जळून खाक झाली. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आग विझविली. अचानक लागलेल्या आगीमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही काळ ट्रॅफिक ठप्प झाले होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

Back to top button