हातभट्टीसाठी लागणारे एक कोटीचे रसायन जप्त; सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई

हातभट्टीसाठी लागणारे एक कोटीचे रसायन जप्त; सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने लोणीकंद परिसरातील वडगाव शिंदे येथे हातभट्टी बनविणार्‍यांवर मोठी कारवाई केली. या वेळी तब्बल 1 कोटी 6 लाख 95 हजारांचे रसायन आणि दीड हजार लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. या रसायनाच्या माध्यमातून तब्बल 2 लाख 10 हजार लिटर दारू तयार करण्यात येणार होती.
याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून आरोपींनी जमीन खोदून सिमेंटच्या टाक्या बनविल्या. त्यानंतर त्यावर माती टाकून त्या टाक्या झाकण्यात आल्या होत्या.

अशोक गोवर्धन सोलंकी (वय 44, रा. वडगाव शिंदे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, सोलंकी याचे साथीदार अरुण रमेश कुंवरिया, संजय जगन्नाथ कुंवरिया (रा. वडगाव शिंदे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस अंमलदार तुषार भिवरकर यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक हद्दीत गस्तीवर होते. यादरम्यान वडगाव शिंदे भागातील शेतामध्ये अशोक सोलंकी याने मनुष्याला गुंगी येऊन हानी होईल अशाप्रकारे गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारी रसायन भट्टी लावली असल्याची महिती अंमलदार तुषार भिवरकर यांना मिळाली.

त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, अंमलदार तुषार भिवरकर, अमित जमदाडे, सागर केकान, अमेय रसाळ, संदीप कोळगे, बाबा कर्पे, राजेंद्र कुमावत, अजय राणे, ओंकार कुंभार, इम—ान नदाफ, इरफान पठाण, हनुमंत कांबळे, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे, मनीषा पुकाळे यांच्या पथकाने वडगाव शिंदे भागातील शेतामध्ये छापा टाकला. त्या वेळी शेताच्या जवळपास प्रचंड उग्र वास येत होता. पोलिसांच्या पथकाने सर्वत्र शोध घेतला असता जमिनीमध्ये खड्डा खोदून त्यात दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शेतातील वेगवेगळ्या सात ठिकाणाहून 2 लाख 10 हजार लिटर दारू बनविण्यासाठी लागणारे तब्बल 1 कोटी लाखांचे रसायन जप्त केले. याशिवाय 1 लाख 80 हजार रुपये किमतीची दीड हजार लिटर तयार दारू, दारू बनविण्यासाठी लागणारा 15 हजारांचे साहित्य, असे एकूण 1 कोटी 6 लाख 95 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news