विद्यापीठाच्या पेट परीक्षेवरून प्रश्नचिन्ह : यूजीसीच्या निर्णयाकडे लक्ष

विद्यापीठाच्या पेट परीक्षेवरून प्रश्नचिन्ह : यूजीसीच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीकडून पीएच.डी. प्रवेशाबाबत नवनवीन निर्णय जाहीर केले जात असल्याने पीएच.डी. प्रवेशास इच्छुक असणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घेण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यूजीसीकडे केलेल्या पत्रव्यवहाराला अद्याप उत्तर मिळाले नाही. त्यामुळे यूजीसी विद्यापीठाच्या पेट परीक्षेला हिरवा कंदील दाखवणार की नेट परीक्षेच्या आधारेच पीएच.डी. प्रवेश होणार यावरून विद्यापीठातील अधिकार्‍यांची धाकधूक वाढली आहे.

यूजीसीच्या सूचनेनुसार विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी नियमावलीत बदल केले असून पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेची पूर्ण तयारी केली आहे. परंतु नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश देण्याची घोषणा केल्यामुळे विद्यापीठाने पेट परीक्षा घेण्याबाबत यूजीसीकडे पत्रव्यवहार केला. परंतु 15 दिवस उलटून गेले तरी यूजीसीकडून विद्यापीठाला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे विद्यापीठाची पेट परीक्षा रखडली असून विद्यापीठाच्या अधिकार्‍यांची चिंता वाढली आहे. तसेच यूजीसीकडून पत्राला केव्हा उत्तर मिळणार याकडेही अधिकारी डोळे लावून बसले आहेत.

विद्यापीठाला पेट परीक्षा घेण्याची परवानगी मिळाली तर पुढील एक दोन महिन्यात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होईल. परंतु यूजीसीने नेट परीक्षेच्या आधारेच प्रवेश देण्याबाबत आदेश दिले तर विद्यार्थ्यांना येत्या जून महिन्यात होणारी नेट परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर जाहीर होणार्‍या निकालाच्या आधारे जुलै-ऑगस्ट महिन्यात विद्यापीठाला पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया राबवणे भाग पडेल. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी तीन ते चार महिने वाट पाहावी लागेल. त्यामुळे यूजीसी पेट परीक्षेबाबत काय निर्णय देणार याकडे विद्यार्थ्यांसह विद्यापीठ प्रशासनाचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news