विदेशी मद्यावर ‘उत्पादन शुल्क’ची कारवाई; 87 लाखांचा मुद्देमाल जप्त

file photo
file photo
Published on
Updated on

पुणे/येरवडा : पुढारी वृत्तसेवा

दोन कंटेनर भरून गोवा राज्यात तयार झालेल्या बनावट विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. यामध्ये दोन कंटनेरसह तब्बल 87 लाख 60 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्र. 1 आणि राज्य उत्पादन शुल्कच्या तळेगाव विभागाने केलेल्या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंटेनरचालक जयकिसन धीमाराम ढाका, सुजानाराम जियाराम बिष्णोई (दोघे रा. बाडमेर, राजस्थान) अशी अटकेतील त्या दोघांची नावे आहेत.

सोमाटणे फाटा बाह्यवळण व तळेगाव टोलनाका या परिसरात बनावट विदेशी मद्यसाठा दोन कंटेनरमधून येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून ताब्यात घेतलेल्या दोन कंटेनरमध्ये मॅक्डॉल नं. 1 व्हिस्की, टुबर्ग स्ट्राँग बिअर, आईस मॅजिक व्होडका, अँड्रियल व्होडका, रॉयल ब्लू व्हिस्की या विदेशी मद्याचे एकूण 1006 बॉक्स मिळून आले.

सदर जप्त दारूची किंमत 59 लाख 60 हजार 400 रुपये एवढी आहे, तर दोन कंटेनर वाहने व इतर जप्त मुद्देमालाची किंमत 87 लाख 60 हजार 400 इतकी आहे. कारवाईत अधीक्षक सी. बी. रजपूत, उपअधीक्षक युवराज शिंदे, निरीक्षक संजय सराफ, एम. आर. राठोड, स्वाती भरणे आदींनी कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, दीपक सुपे करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news