वरवंडकरांकडून जंगी स्वागत; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात साडेचार लाख वारकर्‍यांचा मेळा

वरवंडकरांकडून जंगी स्वागत; तुकोबांच्या पालखी सोहळ्यात साडेचार लाख वारकर्‍यांचा मेळा

अक्षय देवडे

पाटस : दौंड तालुक्यातील वरवंड येथील दुसर्‍या मुक्कामासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने यवत (ता. दौंड) येथे भैरवनाथ मंदिरातून रविवारी (दि. 26) पहाटे वरवंडच्या दिशेने प्रस्थान केले. तब्बल बारा तासांच्या प्रवासानंतर वरवंड गावच्या सीमेवर पालखी येताच ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात पालखीला पुष्पहार अपर्ण करून जंगी स्वागत केले. या वेळी वरवंड गावच्या सरपंच मीनाताई दिवेकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष राहुल दिवेकर,

माजी उपसरपंच प्रदीप दिवेकर, गोरख दिवेकर, संजय दिवेकर, तानाजी दिवेकर, देविदास दिवेकर, भालचंद्र शितोळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ पालखीचे स्वागत करण्यासाठी वरवंड गावच्या सीमेवर आले होते. वारकरी पुणे-सोलापूर महामार्गावर काही ठिकाणी विसावले होते, तर काही मार्गक्रमण करीत होते. एरवी कर्णकर्कश आवाजाने वेगात जाणार्‍या वाहनांची संख्या पूर्णपणे थांबलेली होती. पालखी सोहळ्यातील वैष्णव आणि त्यांच्या सेवेत त्यांची साधनसामग्री वाहून नेणारे ट्रक-ट्रॅक्टर धीम्या गतीने पालखी सोहळ्याबरोबर वरवंडच्या दिशेने सरकताना दिसत होते.

शिस्तीत मार्गक्रमण…
मागील दोन वर्षांच्या पालखीच्या तुलनेत यंदाच्या पालखी सोहळ्यात यंदा जास्त संख्येने वारकरी सामील झाले आहेत. सुमारे साडेचार लाख वारकर्‍यांचा हा मेळा अत्यंत शिस्तीने धुवाधार तसेच रिमझिम पडत असलेल्या पावसात वरवंडकडे चालला होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news