वडीलच पैसे घेऊन लावत होते विवाह; विरोध केल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण

वडीलच पैसे घेऊन लावत होते विवाह; विरोध केल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दोन लाख रुपये व अ‍ॅक्टिव्हा दुचाकी घेऊन आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीचा वडीलच जबरदस्तीने विवाह लावून देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने या विवाहाला विरोध केला असता तिला मारहाणदेखील करण्यात आली. मात्र, औरंगाबाद येथून पुण्यात येऊन मुलीने हा प्रकार आईच्या कानावर घातला.

याप्रकरणी एका 34 वर्षांच्या महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 54 वर्षांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ऑगस्ट 2017 ते 2021 या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा 54 वर्षांच्या व्यक्तीसोबत विवाह झाला होता. त्यांना एक 17 वर्षांची मुलगी आहे.

तिचा विवाह करण्याच्या उद्देशाने त्याने तिला प्रलोभने दाखवून ऑगस्ट 2017 मध्ये औरंगाबाद येथे नेले. तिला औरंगाबाद येथील एका तरुणाबरोबर लग्न करण्याची जबरदस्ती केली. त्या बदल्यात त्याने त्या तरुणाकडून दोन लाख रुपये व दुचाकी घेतली.

मुलीने या लग्नाला विरोध केल्यावर तिला मारहाण केली. ही मुलगी संधी साधून आपल्या आईकडे पुण्यात परत आली. तिने आईला हकिगत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून, सहायक पोलिस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news