पुणे : पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या जूनमध्ये संपूर्ण राज्यात सर्वांत कमी पाऊस पुणे जिल्ह्यात झाला असून, पाच हवामान केंद्रांवर शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. दर वर्षी पुणे जिल्ह्यात 20 जूनपर्यंत 175 ते 200 मिलिमीटर इतका सरसरी पाऊस पडतो. मात्र, यंदा ही सरासरी अवघ्या 28 ते 30 टक्क्यांवर आली आहे.
जिल्ह्यात उणे 70 ते उणे 75 टक्के पाऊस झाला आहे. जूनच्या वीस दिवसांत सर्वाधिक पाऊस जुन्नर तालुक्यात 106 मिमी इतका झाला असून, त्यापाठोपाठ बारामती 102 टक्के, तर शिरूर तालुका 79 टक्क्यांवर असून, बाकी सर्व तालुक्यांची सरासरी 10 ते 12 टक्क्यांवर आहे. गेल्या पाच वर्षांतील ही नीचांकी आकडेवारी आहे.
आंबेगाव (14),बारामती (102) , भोर (4), चिंचवड (शून्य), दौंड (41), इंदापूर (38), जुन्नर (102), खेड (30),लोणावळा (19), एनडीए (शून्य), मुळशी (शून्य), लोहगाव (शून्य), पुणे शहर (28 ), पुरंदर (35), शिरूर (79), तळेगाव (शून्य), मावळ (3.8), वेल्हे (2.5).
हेही वाचा