

पुणे : पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावर तसेच आळंदी आणि देहूमध्ये करावयाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषदेला 6 कोटी 73 लाख 20 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.
पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणार्या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याचेही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
एकूण मंजुरीच्या वीस टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी चौतीस लाख चौसष्ठ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे.
हेही वाचा