

पुणे(पुणे) : मेट्रोच्या दुसर्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर कोथरूडकरांना थेट पिंपरी-चिंचवडपर्यंत आणि पिंपरी-चिंचवडकरांना थेट कोथरूडपर्यंत मेट्रोने प्रवास करता येणे लवकरच शक्य होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर आता पहिल्या टप्प्यात वनाज ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी ते फुगेवाडीदरम्यान मेट्रो ट्रेनची सेवा सुरू आहे. यातून प्रवासी वाहतूकसुद्धा सुरू आहे. मात्र, दुसरा टप्पा खुला झाला नसल्यामुळे पुणेकरांना मेट्रोने दोन्ही शहरांत ये-जा करता येत नाही. आता दुसर्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यावर पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोने दोन्ही शहरांत प्रवास करणे शक्य होणार आहे.
दुसर्या टप्प्यात मेट्रोकडून गरवारे कॉलेज ते रुबी हॉलपर्यंतचा मार्ग खुला करण्याचे नियोजन आहे. याच मार्गावरील सिव्हील कोर्ट स्थानकापर्यंत मेट्रोची दुसरी ट्रेन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्थानकावर आल्यावर पुणेकरांना भूमिगत स्थानकामार्गे पिंपरीमध्ये जाणे शक्य होणार आहे. तर, पिंपरीवरून आल्यानंतर सिव्हील कोर्ट स्थानकातून एलिव्हेटेड स्थानकामार्गे कोथरूडमधील वनाज स्थानकापर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोच्या दुसर्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा