मुलाला दवाखान्यात नेताना महिलेला मारहाण

मुलाला दवाखान्यात नेताना महिलेला मारहाण

पुणे : एक वर्षाच्या मुलाला दवाखान्यात नेत असताना महिलेला गल्लीतून जाऊ नको व येथे परत येऊ नको म्हणत मारहाण करीत गंभीर जखमी करणार्‍या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील सर्व्हे नंबर 12 येथे घडला. मुन्नी सय्यद (वय 48), फिरदोस सय्यद (वय 19) आणि शब्बू सय्यद (वय 26, तिघेही रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा एक वर्षाचा मुलगा आजारी असल्याने त्या व त्यांच्या आई मुलाला रुग्णालयात नेत असताना गल्लीमध्ये राहणार्‍या मुन्नीने व तिच्या मुली फिरदोस अणि शब्बू यांनी तिला अडविले. तिला शिवीगाळ केली तसेच मुलाल परत येथे आणू नको म्हणतत्यांना मारहाण देखील केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news