महापालिकेच्या शाळांचा निकाल 91.23 टक्के; मराठी, इंग्रजीपेक्षा उर्दू विभागाचा निकाल जास्त

महापालिकेच्या शाळांचा निकाल 91.23 टक्के; मराठी, इंग्रजीपेक्षा उर्दू विभागाचा निकाल जास्त
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या माध्यमिक शाळांचा दहावीचा निकाल 91.23 टक्के लागला आहे. परिक्षेला बसलेल्या 3 हजार 445 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 143 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल 91 टक्के, इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 89.51 टक्के तर उर्दू माध्यमांच्या शाळांचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.67 टक्के लागला आहे.

गरीब घरातील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी 43 माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत. यामध्ये 22 मराठी माध्यमांच्या, 17 इंग्रजी आणि 4 उर्दू माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. तर 37 शाळांमध्ये दहावीचे वर्ग आहेत. या शाळांमधून दहावीच्या परीक्षेसाठी 3 हजार 445 विद्यार्थी बसले होते.

त्यापैकी 3 हजार 143 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी माध्यमाच्या मंगळवार पेठेतील बाबुराव सणस, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन, डॉ. वसंतदादा पाटील विद्यानिकेतन, उर्दू माध्यमाची बोपोडी येथील उर्दू विद्या आणि इंग्रजी माध्यमाच्या तुपे आणि राजर्षी शाहु महाराज विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news