नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढणार | पुढारी

नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी-पालकांचे लक्ष अकरावी, डिप्लोमा, आयटीआय प्रवेशांकडे लागले असून, या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना वेबसाइटवर जाउन ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत.

साधारण 83 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्याने यंदा देखील नामांकीत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस राहणार आहे. प्रवेशासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही प्रवेशासाठी जागा उपलब्ध राहणार आहे. राज्यातील पुणे- पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर, उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया 30 मेपासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया निकालानंतर सुरू होणार होती. मात्र, प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांची नोंदणी पूर्ण झालेली नाही. ही नोंदणी सोमवारपर्यत पूर्ण होणार आहे. शालेय शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकरावी प्रवेशासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच जागा उपलब्ध राहणार आहेत.

नाशिक : चणकापूर धरणातून बिगरसिंचन आवर्तन, पाणीचोरी रोखण्यासाठी वीजपुरवठा बंद

पॉलिटेक्निकसाठी करा 30 पर्यंत नोंदणी

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या प्रवेशासाठी साधारण 1 लाख जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतीही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे. दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसनक्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण भरावेत. माहितीसाठी https://dte.maharashtra.gov.in या वेबसाइटवर संपर्क साधावा.

आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया सुरू

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे (डीव्हीईटी) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यंदा सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून 1 लाख 49 हजार 268 जागांवर प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्याच्या घराजवळील आयटीआयमध्ये दररोज सकाळी 10 वाजता मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाइन किंवा आयटीआयमध्ये ऑफलाइन पद्धतीने भरता येईल. मात्र, अर्जात मोबाइल नंबर देणे अनिवार्य आहे.

हेही वाचा

खानापूर तालुक्यात लोंढा परिसरात आज-उद्या वीज खंडित

आयुष इनामदार ‘शंभर नंबरी’; पुणे शहरात पहिला; सर्व विषयांत 100 टक्के

बेळगाव: काँग्रेस नेत्यांमागील ईडीचा ससेमिरा थांबवा ; काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 

Back to top button