महा-ई-सेवा केंद्राकडून नागरिकांची लूट; नाममात्र दरासाठी अवाच्या सवा रक्कम

महा-ई-सेवा केंद्राकडून नागरिकांची लूट; नाममात्र दरासाठी अवाच्या सवा रक्कम

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

शैक्षणिक वर्षाला काही दिवसांनी सुरुवात होईल. सध्या शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी लागणार्‍या दाखल्यांसाठी पालकांची व विद्यार्थ्यांची धावपळ सुरु आहे. प्रवेश घेण्यासाठी एखादे तरी प्रमाणपत्र कमी असले तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे दाखला वेळेत मिळणे गरजेचे असते. मात्र, दाखला वेळेत मिळण्यासाठी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात आहे.

सध्या शहरातील तहसिल कार्यालये आणि महा-ई-सेवा केंद्रात गर्दी पाहायला मिळत आहे. शहरात 95 महा-ई-सेवा केंद्र व 1 सेतू केंद्र कार्यरत आहेत. सध्या सरकारी कामांसाठी विविध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. केंद्राकडे नागरिक आवश्यक ते कागदपत्र सादर करताहेत. दररोज रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर, डोमिसाईल, राष्ट्रीयत्वाचा दाखला, शिष्यवृत्ती, यूपीएससी, एमपीएससी, नोकरी, वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी नागरिकांच्या चकरा सुरू आहेत.

नागरिकांना वेगवेगळ्या दाखल्यांसाठी शासनाने दर ठरवून दिलेले आहेत. त्याचे दरपत्रक तहसिल कार्यालयात लावण्यात आले आहे. कोणत्याही दाखल्यासाठी 35 रूपये तर नॉन क्रिमिनल आणि जातीच्या दाखल्यासाठी 58 रूपये तर उत्पन्न व रहिवासी दाखल्यासाठी 34 रुपये आकारले जातात. मात्र, वेगवेगळ्या सेवा केंद्रात त्यासाठी चारशे ते पाचशे रूपये आकारण्यात येतात.

आकुर्डी तहसील कार्यालयातील दरपत्रकातील दाखल्याचे दर

दाखल्याचा प्रकार                         दर               कालावधी

वय/अधिवास व रहिवास प्रमाणपत्र  33 रू.60 पैसे    15 दिवस
मराठा जातीचे प्रमाणपत्र                57 रू.20 पैसे    21 दिवस
केंद्र शासनाचे प्रमाणपत्र                 33 रू.60 पैसे   15 दिवस
10 टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 33 रू.60 पैसे   15 दिवस
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र 3                3 रू.60 पैसे   15 दिवस
सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र                   33 रू.60 पैसे     1 दिवस
जात प्रमाणपत्र                              57 रू.20 पैसे   21 दिवस
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र              57 रू.20 पैसे    21 दिवस
ऐपतदार प्रमाणपत्र                         57 रू.20 पैसे   21 दिवस
महिला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र    33 रू.60 पैसे    15 दिवस
रहिवासी प्रमाणपत्र                     33 रू.60 पैसे       15 दिवस

आमच्याकडे बहुतांश पालक प्रवेशाची पूर्तता करणारे एखादे कागपत्र नसेल तर शाळा प्रवेश देत नाही. त्यामुळे एका पालकांस तातडीने उत्पन्नाचा दाखला हवा असल्यास कार्यालयाकडून दाखले मिळण्यास वेळ लागतो. मात्र, एजंटकडे गेल्यानंतर दुप्पट तिप्पट पैसे देवून लगेच दाखला मिळतो. पाल्याचे नुकसान होवू नये वेळेत दाखला मिळावा यासाठी पालकांना नाईलाजास्तव ज्यादा पैसे देवून दाखला मिळवावा लागतो.

                                    -शरण शिंगे, उपाध्यक्ष, आरटीई पालक संघ

आमच्याकडे ज्यादा पैसे आकारल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या नाहीत. याबाबत आमच्या दोन्ही मंडळ अधिकार्यांकडून सेवा केंद्रांची तपासणी सुरु आहे.

    -गीता गायकवाड, अप्पर तहसीलदार

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news