शिरसंगीत दोन एकरांत पसरलाय महाकाय वटवृक्ष! | पुढारी

शिरसंगीत दोन एकरांत पसरलाय महाकाय वटवृक्ष!

आजरा; पुढारी वृत्तसेवा : जैवविविधतेने समृद्ध आजरा तालुक्यात 19 देवराई आहेत. त्यापैकी सर्वात मोठी देवराई शिरसंगी येथे आहे. येथील वटवृक्ष सुमारे दोन एकरांत पसरला आहे. तालुक्यात विविध गावांतील देवराईंच्या माध्यमातून गावांची समृद्धी, संस्कार, परंपरा व एकोपा टिकून आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत आजरा तालुका पसरला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात जंगल प्रदेश जास्त आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवराई पाहावयास मिळतात.

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेले जंगल. पंचमहाभूतांशी (निसर्ग किंवा देव) ही संकल्पना जोडली गेली आहे. तालुक्यातील स्थानिक रहिवाशांनी ही संकल्पना जपली आहे. शिरसंगीबरोबरच तालुक्यात पेरणोली, शेळप, मेढेवाडी, उचंगी, चाफवडे, चितळे, पोळगाव, देऊळवाडी, लाटगाव, एरंडोळ, यमेकोंड, किणे, कर्पेवाडी, मसोली, हाळोली, गवसे, दाभिल या गावांतदेखील देवराई आढळून येतात.

 

Back to top button