‘मसाज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन विदेशी तरुणींसह आठ तरुणींची सुटका

‘मसाज’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन विदेशी तरुणींसह आठ तरुणींची सुटका

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरेगाव पार्क भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत ली ब्यूटी स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या वेळी दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आठ तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये दोन विदेशी तरुणींचा सहभाग आहे.

या प्रकरणी किरण चंद्रकांत कोळी (वय 29, रा. नेहरुनगर, पिंपरी), इंजमामुल अब्दुल जलील हुसेन (वय 19, रा. कोरेगाव पार्क) यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुकुल घुले, अनुज कुमार, राकेश पांडे, अब्दुल बतेने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांनी या संदर्भात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मसाज सेंटरमधील व्यवस्थापक कोळी आणि हुसेन यांना अटक करण्यात आली. या कारवाईत आठ तरुणींना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाने तरुणींना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक आणि पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news