बंडखोर आमदारांविरोदात ‘जोडे मारो आंदोलन’
पुणे
बंडखोरांविरोधात ‘जोडे मारो’; शिवसैनिक आक्रमक; कोथरूड विभागाच्या वतीने आंदोलन
पुणे : शिवसेनेतील बंडाळीचे पडसाद शहरातही उमटले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ कोथरूड विभागाच्या वतीने बंडखोर आमदारांविरोदात 'जोडे मारो आंदोलन' कर्वे पुतळा चौकात करण्यात आले. शिवसेना, युवासेना, युवतीसेना, अंगीकृत संघटनेतील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. त्या प्रसंगी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, नितीन शिंदे, भारत सुतार, श्रीपाद चिकणे, किशोर सोनार, राजेश पळसकर, राम थरकुडे, नितीन पवार, अनिल घोलप, उमेश भेलके यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.
हेही वाचा

