

पुणे : पुढारी वृत्तसेवा: फेसबुकवर तरुणीबरोबर मैत्री करणे एकाला 5 लाख 64 हजारांना पडल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात तीन जणांसह बँक खातेदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांकी त्यागी, नंदिनी, लामसेमुनताईथुल व इतर बँक खातेधारक व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सिद्धांत विजय कांबळे (30, रा. एनडीए रोड, कोंढवे धावडे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2021 मध्ये फिर्यादीची फेसबुकवरून एका निशा नावाच्या तरुणीशी ओळख झाली होती. हीच तरुणी काही दिवसांनंतर एअरपोर्टवर तब्ब्बल 3 कोटींचा डीडी घेऊन आली असल्याची बतावणी फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने केली.
तसेच जास्तीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन 5 लाख 64 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 8 जुलै 2021 ते 9 जुलै 2021 दरम्यान घडला.
हेही वाचा