पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 17 जूनला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून, 7 जुलैला अंतिम याद्या प्रसिद्ध होणार आहेत.
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभागनिहाय आणि त्यामधील एससी, एसटीसह महिला आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यानुसार निवडणुकीच्या टप्प्यातील दुसरा महत्त्वाचा मतदारयादी निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत 31 मेपर्यंत विधानसभा मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेल्या, वगळलेल्या आणि दुरुस्त्या विचारात घेऊन प्रभागनिहाय मतदार यादी विभाजन होणार आहे.
त्यानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 17 ला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 25 जूनपर्यंत या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. त्यानंतर 7 जुलैला प्रभागनिहाय अंति
हेही वाचा