

एका राजकीय पक्षाच्या महिला उमेदवारासाठी आम्ही पथनाट्य तयार केले असून, जवळपास 60 कलाकार ठिकठिकाणी जाऊन पथनाट्य सादर करणार आहेत. सध्या पथनाट्याची रंगीत तालीम सुरू असून, अनेक नामवंत कलाकारांचाही त्यात सहभाग आहे. निवेदकही प्रचार मोहिमांच्या कार्यक्रमांच्या निवेदनासाठी काम करत आहेत. प्रचार मोहिमांमध्ये लोककलावंतांचाही सहभाग आहे.– योगेश सुपेकर, निवेदक-कलाकारआता प्रचाराचे स्वरूप डिजिटल माध्यमाकडे वळले आहे. पारंपरिक प्रचार मोहिमांसह सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. त्यामुळे यंदा काही राजकीय पक्षांतील उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या ऑडीओ क्लिप्ससाठी मी आवाज दिला. हे ऑडीओ क्लिप्स व्हॉट्सअॅपवर पाठविले जाणार असून, प्रचारासाठी वापरले जाणार्या रिक्षा आणि व्हॅनवरही ऐकायला मिळणार आहेत. निवडणुका आल्या, की कलाकारांना प्रचारासाठीचे काम मिळते. त्यामुळे कलाकारांना चांगले अर्थार्जनही होते.– राहुल भालेराव, कलाकार
हेही वाचा