पुणे : सराईत चोरट्याला पोलिसांकडून अटक

पुणे : सराईत चोरट्याला पोलिसांकडून अटक

Published on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहने चोरी करणार्‍या सराईत चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याने चोरी केलेली वाहने विविध ठिकाणी पोलिसांनी पकडू नये म्हणून सोडून दिल्याचे सांगितले. ईस्माईल शफी सय्यद (वय 44, रा. लक्ष्मीनगर कोंढवा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील पाच गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशी वाहने त्याने चोरी केल्याचे समोर आले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे हे पथकासह हद्दीत वाहनचोरीच्या अनुषंगाने गस्तीवर होते. त्यावेळी कर्मचार्‍यांना वाहनचोरी करणार्‍या सराइताने छोटा हत्ती टेम्पो चोरी केल्याचे समजले. त्यानुसार शिवनेरीनगर परिसरात जाऊन माहिती घेतली असता, चोरटा हांडेवाडी चौकातील एका चहाच्या ठेल्यावर चहा पीत असल्याचे पथकाला समजले. त्याला अटक करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news