पुणे : मोटारसायकल चोरांची टोळी चाकणला जेरबंद

चाकण पोलिसांनी हस्तगत केलेल्या चोरीच्या दुचाकी व आरोपी.
चाकण पोलिसांनी हस्तगत केलेल्या चोरीच्या दुचाकी व आरोपी.
Published on
Updated on

चाकण, पुढारी वृत्तसेवा : चाकण पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद केली असून, त्यांच्याकडून तब्बल 12 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 25 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांवर चाकण , निगडी, शिक्रापूर आणि कोतवाली (अहमदनगर) आदी पोलिस ठाण्यांमध्ये 13 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर), फारूख अन्सार पठाण (रा. चाकण, ता. खेड ) व योगेश प्रकाश वटांबे (रा. बालाजीनगर चाकण, ता. खेड, जि. पुणे) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे व तपास पथकास माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अशोक सोनवणे तसेच फारूख पठाण व योगेश प्रकाश वटांबे हे मोटारसायकल चोरीकरिता साबळेवाडी व मेदनकरवाडी, चाकण परिसरात येणार आहेत. आरोपी अशोक सोनवणे हा भोसे, चाकण येथील चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असताना त्यास सापळा लावून तपास पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलिस ठाणे व इतर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकूण 19 हीरों होंडा कपंनीच्या स्प्लेन्डर व स्प्लेन्डर प्लस मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे , पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सहा. पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल देवडे, सहा. पो. निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड व सुरेश हिंगे, हनुमंत कांबळे, प्रदीप राळे, निखिल वर्पे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news