पुणे : बारामती तालुक्यात शेतीपंप चोरणारी टोळी गजाआड

बारामती पोलिसांना शेतीपंप व शेती अवजारे चोरणारी टोळी पकडण्यात यश आले.
बारामती पोलिसांना शेतीपंप व शेती अवजारे चोरणारी टोळी पकडण्यात यश आले.
Published on
Updated on

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुका पोलिसांनी शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युतपंप व शेतीची अवजारे चोरणारी टोळी गजाआड केली असून, त्यांच्याकडून एकूण 14 गुन्हे उघड केले आहेत. घरफोडी, मोटारसायकली चोरणार्‍या चोरांना पकडण्यात यश आल्यानंतर तालुका पोलिसांनी आता शेतकर्‍यांना दिलासा देत शेतकर्‍यांच्या विहिरीवरील पंप व शेतीची अवजारे चोरी करणारी टोळी गजाआड केली आहे. एकूण 7 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

घरफोडीनंतर पंपचोरीचा धडाका

बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खेडेगावांमध्ये बर्‍याच दिवसांपासून शेतकर्‍यांच्या विहिरीवरील पंप, शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारी अवजारे चोरी करणार्‍या टोळीने धुमाकूळ घातला होता. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी हे चोरटे पकडण्यासाठी मोहीम उघडली होती.

तपास पथकाच्या परिश्रमाला यश

तपास पथकाने या टोळीचा अहोरात्र शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर पोलिस पथकास या चोरट्यांना पकडण्यात यश आले. दि. 26 मे रोजी अक्षय बाळासो हुले (वय 26), अक्षय लक्ष्मण घोलप (वय 19), अभिषेक दत्तात्रय गावडे (वय 19, सर्व रा. मेडद, ता. बारामती) आणि संतोष जगन्नाथ खांडेकर (वय 37, रा. जळगाव क. प., ता. बारामती) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांच्याकडे 2 इंजिन व पाण्यातील 11 मोटारी व एक शेतीच्या मशागतीसाठी वापरण्यात येणारा कल्टिवेटर मिळून आले आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राम कानगुडे, अमोल नरुटे, रणजित मुळीक, पोलिस नाईक गावडे, प्रशांत राऊत यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news