

पुणे : पीएमपीएलच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळील चौकात घडली. सिद्दराम अडेवप्पा कुंभार (वय 42, रा. कात्रज) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी संबंधित बसचालकावर सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दराम हे एका खासगी ठेकेदाराकडे काम करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते दुचाकीवरून स्वारगेटकडून कात्रजकडे निघाले होते. या वेळी बसचा धक्का लागून ते खाली पडल्याने पाठीमागील चाकाखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास सहकारनगर पोलिस करीत आहेत.