पुणे : धरणे ओसंडून वाहू लागली; भीमा-कृष्णा खोर्‍यातील धरणांत 90 टक्के पाणीसाठा

पुणे : धरणे ओसंडून वाहू लागली; भीमा-कृष्णा खोर्‍यातील धरणांत 90 टक्के पाणीसाठा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दमदार पावसाने भीमा-कृष्णा खोर्‍यातील बहुतेक धरणे भरली असून, 31 मोठ्या धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ झाला आहे. दोन्ही खोर्‍यांतील धरणांत एकूण 90.27 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. भीमा उपखोर्‍यातील मोठ्या व मध्यम 26 प्रकल्पांची साठवणक्षमता 198 अब्ज घनफूट (टीएमसी) असून, शुक्रवारी सकाळी 188 टीएमसी (94.81 टक्के) पाणीसाठा झाला आहे. उजनी धरण पूर्ण भरले असून, त्यातून 20 हजार क्युसेक (घनफूट प्रतिसेकंद) वेगाने पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे.

पुणे शहरास पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला साखळीतील चार धरणांत एकूण 28 टीएमसी (96 टक्के) पाणीसाठा आहे. निरा खोर्‍यातील चार धरणांत एकूण 47.25 टीएमसी (97.75 टक्के) पाणीसाठा झाला आहे. कुकडी खोर्‍यातील सात धरणांत एकूण 28 टीएमसी (79.37 टक्के) पाणीसाठा आहे. कृष्णा उपखोर्‍यात 12 धरणांची एकूण साठवण क्षमता 209.88 टीएमसी आहे. त्यात 180 टीएमसी (86 टक्के) पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण 82 टक्के भरले आहे.

पुणे जिल्ह्यातील 31 धरणांतून विसर्ग सुरू
पुणे जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, चासकमान, पवना, कासारसाई, कलमोडी, भामा आसखेड, आंद्रा, वडिवळे, गुंजवणी, भाटघर, निरा देवघर, वीर, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, मुळशी या धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. यातील प्रमुख धरणांतील पाणी उजनी जलाशयात जात असल्याने उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. कृष्णा उपखोर्‍यातील धोम वगळता अन्य अकरा धरणांतून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, कोयना, वारणा, कासारी, तुळशी, राधानगरी, दूधगंगा, पाटगाव या धरणांतून नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे.

धरणांतील स्थिती
धरण पाणीसाठा टक्केवारी
(टीएमसी)
टेमघर 3.06 82.52
वरसगाव 12.39 96.63
पानशेत 10.65 100
खडकवासला 1.97 100
पवना 8.27 97.18
चासकमान 7.58 100
भामा आसखेड 7.67 100
गुंजवणी 3.60 97.57
भाटघर 23.16 98.53
निरा देवघर 11.08 94.44
वीर 9.41 100
माणिकडोह 6.39 62.77
डिंभे 11.81 94.54
घोड 3.95 81.00
मुळशी 19.20 95.26
उजनी 53.46 99.79
धोम 9.93 84.95
कण्हेर 8.35 86.98
उरमोडी 8.63 89.47
तारळी 5.28 90.35
कोयना 82.49 82.37
वारणा 24.66 89.52
कासारी 2.34 85.12
तुळशी 3.11 95.90
राधानगरी 7.74 99.63
दूधगंगा 20.80

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news