File Photo
File Photo

पुणे : तडीपार गुन्हेगारास सापळा रचून अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी तडीपार कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीत आला असताना सापळा रचून अटक केली. त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो शहरात आला होता.

सौरभ गोविंद इंगळे (वय 22, रा. कदमवाक वस्ती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सौरभ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला ऑगस्ट 2021 मध्ये दोन वर्षांसाठी परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील यांनी लोणी काळभोर पोलिसांच्या प्रस्तावानुसार तडीपार केले होते. परंतु, तरीही तो परवानगी न घेता कदमवाक वस्तीत आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्याला सापळा रचून पकडले.

logo
Pudhari News
pudhari.news