पुणे : डोर्लेवाडीत छापा टाकून गांजा विक्रेत्याला अटक

बारामती शहर पोलिसांनी डोर्लेवाडी येथे गांजा विक्रेत्यावर कारवाई केली.
बारामती शहर पोलिसांनी डोर्लेवाडी येथे गांजा विक्रेत्यावर कारवाई केली.
Published on
Updated on

बारामती : पुढारीवृत्तसेवा : शहर पोलिसांनी 30 फाटा (डोर्लेवाडी) येथे छापा टाकत अमितकुमार अनिल धेंडे (वय 40, रा. सिद्धार्थनगर, बारामती) या गांजा विकणाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 78 हजार रुपयांचा 3840 ग्रॅम गांजा जप्त केला.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ही माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गांजा विक्रीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार संकपाळ यांच्यासह अभिजित कांबळे, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, मनोज पवार, बंडू कोठे आदी कर्मचार्‍यांनी दोन पंचांना सोबत घेत छापा टाकला.

यावेळी अमितकुमार धेंडे हा गांजा ओळखीच्या लोकांना विकताना आढळून आला. गांजा पोलिसांनी जप्त केला. धेंडे हा शहरातील सिद्धार्थनगर भागातही गांजा विक्री करीत होता. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news