पुणे-नाशिक महामार्गावरील खेड जुना घाटातील सटवाई पावसाने बहरली.
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड जुना घाटातील सटवाई पावसाने बहरली.

पुणे : खेड घाटातील सटवाई वनराई बहरली

Published on

निमगाव दावडी, पुढारी वृत्तसेवा : निमगाव दावडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सध्या पावसामुळे खेड तालुक्यात खरीप पिकांची पेरणी व भात लागवड जोमात सुरू आहे. त्यातच आता सटवाई वनराई बहरली असून, मोरांची कुईकुई देखील वाढली आहे.

खेड तालुक्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड जोमात सुरू आहे. खेड जुना घाटातील सटवाई वनराई क्षेत्रात वन विभागाच्या वतीने विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने वृक्षराजी बहरली आहे.
वन परिक्षेत्र विभागाने जुनी कालबाह्य झाडे काढून त्या ठिकाणी जमिनीची मशागत करून जेसीबीव्दारे खड्डे घेऊन विविध झाडांची व औषधी वनस्पतींची लागवड मागील महिन्यात केली.

खेड नवीन घाट जरी तयार झाला, तरी जुना घाट सुरूच आहे. परंतु, अनेक पर्यटक या घाटात मद्याच्या बाटल्या तसेच इतर कृत्य करीत आहेत. तसेच मुंबई-पुणे येथे जाणारी कोंबडी वाहतूक करणारी वाहने मृत कोंबड्या, सडकी अंडी घाटात टाकत आहेत. त्यामुळे जुना घाट सडक्या अंड्यांनी भरला आहे. प्रवाशांना याचा त्रास होत आहे.

दरम्यान, सटवाई वन परिक्षेत्रात जवळपास 200 ते 300 मोर आहेत. त्या मोरांची काळजी वनक्षेत्र घेत आहे. सटवाई वनराई बहरल्याने पर्यटकांचा ओढा वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news