पिंपरी :साहेब, अपुर्‍या प्रमाणात पाणीपुरवठा आणखी किती दिवस; जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारी

पिंपरी :साहेब, अपुर्‍या प्रमाणात पाणीपुरवठा आणखी किती दिवस; जनसंवाद सभेत नागरिकांच्या तक्रारी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: आमच्या भागात कमी प्रमाणात पाणी येत आहे. पुरेश्या प्रमाणात पाणी साठा होत नसल्याने गैरसोय होत आहे. आणखी किती दिवस पाण्यासाठी हाल सोसावे लागणार आहेत, अशा तक्रारी सोमवारी (दि.27) झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी मांडल्या. सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात आज सभा झाली. एकूण 98 नागरिकांनी 125 पेक्षा अधिक अधिकार्‍यांसमोर तक्रारी मांडल्या. अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 21, 6, 7, 10, 4, 12, 24 आणि 14 नागरिक उपस्थित होते.

शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. पावसाळा सुरू झाला तरी, पालिकेस व्यवस्थितपणे पाणीपुरवठा करता येत नाही का, पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होणार नाही, यासाठी पालिकेला उपाययोजना करता येत नाहीत का, स्वच्छ व उच्च दाबाने सुरळीत पाणीपुरवठा कधी होईल, असे प्रश्न संतप्त नागरिकांनी व्यक्त केले. अनधिकृत नळजोड देऊ नका. त्यावर तातडीने कारवाई करा, असाही सूचना सभेत करण्यात आल्या.

ड्रेनेजलाइनसाठी खोदण्यात आलेले खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत. रस्त्यावरील राडारोडा तात्काळ उचलण्यात यावा. इतरत्र राडारोडा टाकणार्यांवर कारवाई करावी. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. पालिकेने अतिक्रमण हटवलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी. नागरिकांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी नागरी सुविधा केंद्र उभारावेत. सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करावी. अपूर्ण रस्ता डांबरीकरणाचे कामे जलद गतीने करावीत.

तुटलेल्या ड्रेनेज वाहिन्यांची लवकर दुरुस्ती करावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंतनाशक फवारणी करावी, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. सभेचे अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, संजय कुलकर्णी, उपायुक्त अजय चारठाणकर, चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. या वेळी क्षेत्रीय अधिकारी व विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news