पिंपरी संघाची पुण्यावर मात; सलोनी, निकिता,आदिती यांची सुरेख कामगिरी

पिंपरी संघाची पुण्यावर मात; सलोनी, निकिता,आदिती यांची सुरेख कामगिरी
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे लीग कबड्डी स्पर्धेत महिला विभागात लय भारी पिंपरी चिंचवड संघाने वेगवान पुणे संघाचा पराभव करीत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाबूराव चांदेरे सोशल फाउंडेशनच्या वतीने म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. पुरुष विभागात बलाढ्य बारामती संघाने लयभारी पिंपरी चिंचवड संघावर 43-30 अशी मात केली. मध्यंतराला बारामती संघाकडे 22-11, अशी आघाडी होती. बारामती संघाच्या शुभम नेवाळे व बबलू गिरी याने चौफेर चढाया करीत संघाला विजय मिळवून दिला. सिंहगड हवेली संघाने माय मुळशी संघावर 38-33, असा विजय मिळविला.

मध्यंतराला सिंहगड हवेली संघाकडे 21-9, अशी आघाडी होती. सिंहगड हवेली संघाच्या पृथ्वीराज चव्हाण याने जोरदार खेळ करीत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महिला विभागात लय भारी पिंपरी चिंचवड संघाने वेगवान पुणे संघाचा 48-40 असा पराभव केला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे 22-18, अशी आघाडी होती. संघाकडून सलोनी गजमल व निकिता पडवळ यांनी सुरेख चढाया केल्या, तर आदिती चौघुले व विद्या गायकवाड यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

पुणे संघाच्या समृध्दी कोळेकर व सानिका खाडे यांनी जोरदार चढाया केल्या. तर माहेश्वरी वाघ व अंकिता चौव्हान यांनी चांगल्या पकडी घेतल्या. माय मुळशी संघाने झुंजार खेड संघावर 81-33, अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला मुळशी संघाकडे 32-20, अशी आघाडी होती. संघाच्या ऋतिका होनमाने व स्नेहल गोपाळघरे यांनी चांगला खेळ केला. तर धनश्री तेली व साश्री लाठवडे यांनी चांगल्या पकडी घेतल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news