

पिंपरी : शशांक तांबे: औद्योगिक नगरीतील उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रिसायकलिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कंपनीच्या खर्चात कपात होत आहे, तर कंपनी सुशोभीकरणावर यातून भर दिला जात असल्याने परिसर टाकाऊतून टकाटक होत असल्याचे दिसून येत आहे; तसेच कोरोनाकाळातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक कंपन्यांत हा प्रयोग केला जात आहे.
कंपनीच्या खर्चात कपात होत आहे, तर कंपनी सुशोभीकरणावर यातून भर दिला जात असल्याने परिसर टाकाऊतून टकाटक होत असल्याचे दिसून येत आहे; तसेच कोरोनाकाळातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अनेक कंपन्यांत हा प्रयोग केला जात आहे.
कोरोना निर्बंध काळात कर्मचार्यांमध्ये नकारात्मकता होती. त्याचा परिणाम कामावर होत असल्याचे लक्षात आल्याने कंपन्यांनी विविध उपाय सुरू केले.
यामध्ये अनेक कर्मचार्यांनी कंपनीमधील टाकाऊ वस्तूंपासून विविध वस्तू साकारल्या. त्यामुळे कंपनीच्या खर्चात बचतदेखील झाली. कोरोना काळात निर्बंध असल्याने कर्मचार्यांना कामावर देखील निर्बंध पाळावे लागत होते. त्यामुळे कपडे बदलण्याची खोली, हात धुण्यासाठी लिक्विड सोपसाठी स्टॅन्ड आणि बसण्यासाठी बाकडे, कंपनीमध्ये ये-जा करताना सॅनिटायझरचे फवारे तसेच खराब झालेल्या टायर्समध्ये झुडपे लावून परिसराचे सुशोभीकरण केले आहे. अशा अनेक वस्तू स्वतः कर्मचार्यांनी तयार केल्या आहेत.
नकारात्मकतेवर मात
कोरोना महामारीत कर्मचार्यांच्या कलागुणांना संधी मिळाली. दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची निर्मिती कर्मचार्यांनी स्वतः केली. महामारीमध्ये सुरुवातीच्या कडक टाळेबंदीमध्ये अनेक कंपन्या बंद होत्या. नंतर मात्र उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना परवानगी देऊन कंपन्यांना निर्बंध ठेवून काम सुरू करता आले होते. अनेक कर्मचार्यांमध्ये नकारात्मकता आली होती; परंतु विविध प्रकारे कामातून कर्मचार्यांनी त्यावर मात केली.
रिसायकलिंग
उत्पादन क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात माल वाया जातो. त्याचे कालांतराने भंगार होते. कोरोना महामारीत टाळेबंदी आणि निर्बंध होते. भंगार वस्तू घेणार्यांची दुकाने देखील बंद होती. त्यात अनेकदा कामाच्या बाबतीत सूचना येत नसायच्या. त्यामुळे अनेक कंपन्यांमधील कर्मचार्यांनी शक्कल लढवत टाकाऊ वस्तूंचे रूपांतर नियमित वापरात येणार्या वस्तूंमध्ये केले आहे. निर्बंध काळात सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून काम करावे लागत असे. तसेच कपडे बदलण्याच्या जागेत देखील बदल करावे लागत होते. कर्मचान्यांनी स्वतः उपलब्ध वस्तूमधून जागेत पार्टीशन तयार केले सॅनिटायर ठेवायला स्टॅन्ड, साबण ठेवायला जागा तयार केली.
कोरोनाचे निर्बंध असताना कंपनीमधील कर्मचार्यांनी स्वतः अनेक वस्तू तयार केल्या. ज्या वस्तू बाहेरून आणण्यासाठी खर्च करावा लागला असता; परंतु कर्मचार्यांनी स्वतः अनेक वस्तू बनवून खर्च कमी केला.
व्यवस्थापक, बेअरिंग कंपनी