

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भिती, हिंसाचार व दडपशाही विरोधात सामुहिक शपथ घेतली.
महाविद्यालयात आयोजित शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पोवाडा, पाळणा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीत गायन, विविध किल्ल्यांची माहिती दिली.
याप्रसंगी संस्थेत संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षीतिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. सुवर्णा गायकवाड उपस्थित होते.
हेही वाचा