पिंपरी : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

पिंपरी : बिटकॉईनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक

पिंपरी : बिटकॉॅईनमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल 13 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 8 एप्रिल ते 3 मे 2022 या कालावधीत यमुनानगर, निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी राकेश लोहार (वय 38, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.15) फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांना वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत बिटकॉॅईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. आरोपीने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली. या लिंकद्वारे फिर्यादीने तब्बल 13 लाख 67 हजार रुपये भरले. 'मात्र, त्यांना कोणताच परतावा मिळाला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news