पिंपरी: पार्किंगमध्ये खेळणार्‍या चिमुरडीवर अत्याचार

पिंपरी: पार्किंगमध्ये खेळणार्‍या चिमुरडीवर अत्याचार

: सोसायटीच्या पार्किंगमध्ये सायकल खेळत असलेल्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. ही घटना पिंपरीगाव येथे सोमवारी (दि. 13) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने मंगळवारी (दि. 14) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जोएल एलिक हरबर्ट (42, रा. वैभवनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये सायकल खेळत होती. त्यावेळी कुत्रे आडवे आल्याने ती शेजारच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गेली. त्यावेळी आरोपीने तिला बोलावून घेऊन बाजूला घेऊन गेला. त्यानंतर तिच्याशी अश्लीलकृत्य केले. मुलीने घरी गेल्यानंतर तिच्या आईला सांगितले. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news