पिंपरी : नो-पार्किंगमध्येच वाहने उभी, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

पिंपरी : नो-पार्किंगमध्येच वाहने उभी, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
Published on
Updated on

पिंपरी : निगडी-यमुनानगर रस्त्यावर नो पार्किंग झोनमध्ये सर्रासपणे वाहने व हातगाड्या उभ्या केल्या जात आहेत. नो पार्किंगच्या फलकाकडे दुर्लक्ष करून वाहनचालक बिनधास्तपणे वाहने उभी करत असूनही याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. एमआयडीसीकडे जाणार्‍या या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते.

नो- पार्किंगमध्ये उभ्या वाहनांमुळे अनेकदा या रस्त्यावर वाहतूकोंडी निर्माण होते. वाहतूक विभागाचे याबाबीकडे दुर्लक्ष झाल्याने या वाहनांवर कारवाई होत नसून, याचा गैरफायदा घेत वाहन चालक सर्रासपणे वाहने पार्क करीत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या अवैधरित्या पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करून, हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news