

पिंपरी : घरातून सव्वापाच लाखांचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी सहा महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ब्लू रिच सोसायटी, हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी तरुजा भारत भोसले (63, रा. ब्लू रिच सोसायटी, हिंजवडी) यांनी बुधवारी (दि. 15) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातून दुर्मिळ बांगड्या, नेकलेस, कानातले रिंग आदी. सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलिस सहायक निरीक्षक राम गोमरे करीत आहेत.