पिंपरी : गरिबीवर मात करत प्रेमाने मिळवला पहिला क्रमांक

पिंपरी : गरिबीवर मात करत प्रेमाने मिळवला पहिला क्रमांक
Published on
Updated on

पिंपळे गुरव : घरात चार बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार. त्यात घरातील परिस्थिती बेताची, वडील वेठबिगारी कामगार तर आई घरेलु कामगार. आसपास झोपडपट्टी परिसर, अशा कठीण परिस्थित प्रेमा चीगनूरने दहावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

दहावीत मुले गेल्यावर पालक त्यांच्यावर अनेक सोयीसुविधांचा भडिमार करतात. वेगवेगळ्या विषयाचे क्लास लावले जातात. परंतु, अपुर्‍या सोयी सुविधा असताना दांडगा आत्मविश्वास, रोज नियमित दोन तास न चुकता अभ्यास, मोबाईलचा अभ्यासापुरता वापर करून पिंपळे गुरव महापालिकेच्या माध्यमिक शाळेतून प्रेमा अयप्पा चिगनूर हिने प्रथम पटकाविला आहे.

प्रेमा अयप्पा चिगनूर पिंपळे गुरव येथील राजीव गांधीनगर भागात राहते. प्रेमाला आई, वडील, सहा बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. प्रेमा चिगनूर मूळची कर्नाटकची असल्याने घरात कन्नड भाषा जास्त बोलली जाते. प्रेमाचे वडील अयप्पा चिगनुर आणि आई रत्नमा चीगनूर अशिक्षित असून वेठबिगरीचे काम करतात.

कोरोनामुळे ऑनलाईन शाळा असल्याने बहिणीने प्रेमाला मोबाईल घेऊन दिला. घरात बसून रोजचा नियमित विषयाचे नोटस काढण्यावर तिने भर दिला. दहावीची परीक्षा जसजशी जवळ आली तसे प्रेमाने पहाटे उठून सरावला भर दिला. मारिअम्मा आणि रेश्मा चिगनूर या तिच्या मोठ्या बहिणींनी प्रेमाला अभ्यासात वेळोवेळी मार्गदर्शन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news