पिंपरी : आपसात हाणामारी करीत वाहनांची तोडफोड; विठ्ठलनगर येथील घटना

File Photo
File Photo
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: आपसात हाणामारी करीत टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच, हवेत शस्त्र फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना शनिवारी (दि. 6) रात्री विठ्ठलनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिलीप कस्तूर देहाडे (47, रा. नेहरूनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यश विकास पांढरे (29, रा. नेहरूनगर) याच्यासह अन्य सहा ते सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी यश याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप हे घरी असताना त्यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दहा ते बारा जणांचे टोळके कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करून गोंधळ करत होते. तसेच, टोळक्याने पार्किंग मधील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादी आणि इतर नागरिक पार्किंगमध्ये गेले असता आरोपी पळून गेले. यश याला परिसरातील मुलांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

याच्या परस्पर विरोधात यश विकास मांढरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, प्रेम सूर्यवंशी उर्फ बंडल्या (वय 19), साहिल सूर्यवंशी (वय 19), अमन हौसराव शिंदे (वय 25), सुजित, अजित बिराजदार, पंकज ओव्हाळ, एक महिला आणि अनोळखी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमन शिंदे, अजित बिराजदार यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रेम आणि साहिल यांनी फिर्यादीच्या घरासमोर गोंधळ घालून दगडफेक केली. फिर्यादी यांनी याचा जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करीत धारदार हत्याराने डोक्यात वार केला. त्यांनतर आरोपींनी कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तसेच, आरोपींनी एका महिलेला आणि फिर्यादी यांच्या भावाला कोयत्याने मारून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news