पावसाचे पाणी शिरले देवळात, घराघरात; नालेसफाई न झाल्याचा परिणाम

पावसाचे पाणी शिरले देवळात, घराघरात; नालेसफाई न झाल्याचा परिणाम

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात नुकताच पहिला पाऊस झाला आणि नालेसफाई न झालेल्या सोलापूर बाजार परिसरातील कॅनॉल गल्ली परिसरात अक्षरश: दाणादाण उडाली. नालेसफाई अभावी पाणी तुंबून ते घराघरांत शिरले. येथील मारूती मंदिरातही पाणी शिरून तुंबून राहिले. लष्कर – कँटोन्मेंट बोर्डाला महिन्यापूर्वी कळवूनही काहीच कारवाई न झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. सोलापूर बाजार परिसरातील कॅनॉलच्या खालून ड्रेनेज लाईन गेली आहे.

या ड्रेनेज लाईनचे काम सुरू असतानाच येथील डेक्कन टॉवर सोसायटीचा स्लॅब कोसळला आणि त्याचा मलबा या चेंबरमध्ये अडकला. हा मलबा काढून ड्रेनेजलाईन प्रवाहित करावी, अशी मागणी स्थानिकांकडून मागील महिनाभरापासून सुरू होती. मात्र, प्रशासनाकडून पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन या, असे सांगण्यात आले. साहजिकच काम तसेच रेंगाळून राहिल्याने आजची परिस्थिती उद्भवल्याची नागरिकांकडून भावना व्यक्त करण्यात आली.

पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा

स्थानिक परिसरातील नागरिकांनी पुणे कॅन्टोन्मेंट तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क केला असता कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नाही. स्थानिक प्रतिनिधिनीचे या कामाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तरी या परिसरातील साठलेले पाणी लवकरात लवकर काढले जावे, अशी मागणी स्थनिकाकडून करण्यात येत आहे.

कॅन्टोन्मेंट परिसरातील वॉर्ड क्रमांक 5 परिसरामध्ये चेंबर ब्लॉक झाल्यामुळे पाणी तुंबले. तुंबलेले पाणी येथील घराघरांत शिरून तीन – ते चार फूट साचले होते. या वेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधारातच घरातले पाणी बाहेर काढत रात्र घालवावी लागली.

                                            -ज्योती जाया, स्थानिक रहिवासी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news