पिंपरी : हप्ता द्यायची भावालाच धमकी

file photo
file photo

पिंपरी : पिंपरी येथील भाजी मंडईतील लहान भावाच्या फळांच्या दुकानासमोर हातात कोयता घेऊन उभा राहून, 'दर महिन्याला दोन हजार रूपये हप्ता द्यायचा, नाही तर ठार मारीन' अशी धमकी मोठ्या भावाने दिली.

ही घटना शुक्रवारी (10 रोजी) घडली. फिर्यादी सकलेन युसूफ शेख (वय 25, रा. नढे नगर काळेवाडी) यांचा मोठा भाऊ आरोपी तन्वीर युसूफ शेख (वय 33 रा. काळेवाडी) याने हातात कोयता घेऊन फिर्यादीस 'दर महिन्याला दोन हजार रूपये हप्ता द्यायचा नाही, तर ठार मारणार'असल्याची धमकी दिली. त्यानंतर घरी जाऊन फिर्यादीच्या पत्नीस 'तुझ्या नवर्‍याला बाहेर यायला सांग नाही तर, तुझ्या मुलास जाळून मारणार' अशी धमकी दिली. म्हणून फिर्यादीने पिंपरी पोलिस ठाण्यात शनिवारी(11 रोजी) फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news