विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: नीट परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड मिळणार आजपासून

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: नीट परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड मिळणार आजपासून
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (नीट) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मंगळवारपासून (दि.12 जुलै) उपलब्ध होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या https://neet.nta.nic.in/ या वेबसाइटद्वारे ही उपलब्ध असतील. येत्या 17 जुलैला देशातील 497 शहरांमध्ये ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.20 या वेळेत पार पडणार आहे.

'विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक सबमिट करून प्रवेशपत्र उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास 011-40759000 या क्रमांकावर किंवा neet@nta.ac.in. या इमेल आयडीवर संपर्क साधता येणार आहे, असे, एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news