

खोडद : पुढारी वृत्तसेवा : गेल्या पंधरा वर्षांपासुन प्रलंबित असलेला खोडद-निमगावसावा-औरंगपूर रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, रस्त्याच्या कामाकडे लक्ष देण्यास एकाही नेत्याला वेळ मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना डोकेदुखी ठरणार आहे.
खोडद- निमगावसावा -औरंगपूर हा जुन्नर तालुका पूर्व भागातील व जुन्नर विभागाला शिरूर व पारनेर तालुक्यांना जोडणारा जवळचा रस्ता आहे. जुन्नर, शिरूर, पारनेर या तालुक्यांच्या ठिकाणी जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने नेहमी वर्दळीचा असतो, परंतु या रस्त्याची गेल्या पंधरा वर्षांपासून दुर्दशा झाली आहे, परंतु याकडे लक्ष देण्यास प्रशासन व राजकीय पुढार्यांना वेळ मिळत नसल्याने निवडणूक काळात उमेदवार मत मागायला आल्यावर याबाबत जाब विचारला जाणार आहे.
रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी न झाल्यास आगामी निवडणुकीत उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. निवडणुकीपूर्वीच काम मार्गी लागणार की नाही! व लागलेच तर कुणाच्या मार्गदर्शनाखाली लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.