नव्या व्हेरियंटचे राज्यात 48 रुग्ण

नव्या व्हेरियंटचे राज्यात 48 रुग्ण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या 48 रुग्णांचे राज्यात निदान झाले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यात बीए 4 आणि बीए 5 व्हेरियंटचे 30, तर बीए 2.75 च्या 18 रुग्णांचा समावेश आहे. ताज्या अहवालानुसार राज्यात बीए 4 चे दोन, बीए 5 व्हेरियंटचे 28, तर बीए 2.75 व्हेरियंटचे 18 असे एकूण 48 रुग्ण आढळले आहेत.

यात पुणे शहर आणि जिल्ह्यातील 28, ठाणे – 13, सांगली-6, रायगड-4, कोल्हापूर- 2; तर अमरावती आणि जालना येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत बीए 4 आणि बीए 5 रुग्णांची संख्या 192 झाली आहे. बीए 4 आणि बीए 5 व्हेरियंटचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 101, मुंबईत – 51, ठाणे – 16, रायगड- 7, सांगली- 5, नागपूर व पालघर प्रत्येकी 4, कोल्हापूर – 2 रुग्णांची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news