दौंड : धुवांधार पावसाने कुरकुंभ मोरीत साचले पाणी

अतिवृष्टी
अतिवृष्टी

दौंड : पुढारी वृत्तसेवा:  शहरात रविवारी दुपारी एकच्या सुमारास धो-धो पाऊस कोसळला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुरकुंभ मोरी, हुतात्मा चौक, गांधी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल झाले. अनेकांची वाहने बंद पडली, तर काहींना उड्डाणपूल मार्गे जावे लागले.

शहरातून जाणार्‍या अष्टविनायक महामार्गाचे काम अयोग्य पद्धतीने झाल्याने काही दुकानदारांच्या पायर्‍यांपर्यंत पावसाचे पाणी आले. शहराची शान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाण्याचे मोठे डबके साचले. वास्तविक रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदाराला व लोकप्रतिनिधींना रस्ता गावातील मुख्य दुकानांपासून तीन फूट उंच झाला असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते..

परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने पहिल्या पावसातच नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. कुरकुंभ मोरी तुडुंब भरून वाहत होती. घाण पाण्यातून दुचाकीस्वार मार्ग काढीत होते. तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम अंतिम टप्प्यात असले तरी त्याची देखील पावसाळ्यात अशीचkurk अवस्था होण्याची शक्यता आहे. दौंडकरांना कुरकुंभ मोरीच्या घाण पाण्यातूनच ये-जा करावी लागणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news