रत्नागिरी : लांजा-कोर्लेत 7 वर्षीय मुलीची गळफास लावून आत्महत्या

अमरावती
अमरावती
Published on
Updated on

लांजा : पुढारी वृत्तसेवा
सात वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना कोर्ले सरकारवाडी येथे शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोर्ले सरकारवाडी येथे आर्या राजेश चव्हाण ही आपल्या वडिलांसोबत राहते. तिची आणखी एक दुसरी बहीण ही एक अंदाजे दहा वर्षांची आहे. शनिवारी 11 जून रोजी रात्री या दोघी बहिणी घरात खेळत होत्या तर वडील राजेश सुभाष चव्हाण (वय 38) हे कोर्लेफाटा येथे गेले होते. काही वेळाने खेळता खेळता आर्याची मोठी बहीण ही आजी सोबत भांडी घासायला गेली होती. याच वेळेत आर्या हिने घराच्या भिंतीला असलेल्या खिळ्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील या करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news