डिप्लोमा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

डिप्लोमा प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

पुणे : पुढारी वृत्तसेवा

बारावीनंतरच्या पदविका औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. पदविका अर्थात डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 जूनपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत आहे. ज्यांना कागदपत्रे अपलोड करता येणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावयाची आहे. अशा विद्यार्थ्यांना तारीख व वेळ ठरवून दिली जाईल. त्यानुसार अर्ज निश्चिती करावी लागेल.

डिप्लोमा प्रवेशासाठी अर्ज करताना खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना 400 रुपये, तर मागासवर्गीय गटातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणीच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे 31 मार्च 2023 पर्यंतचे वैध असलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे, अशी माहिती तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

असे असेल वेळापत्रक

अर्ज करण्याची मुदत- 9 जून ते 8 जुलै
कागदपत्रांची पडताळणी- 9 जून ते 8 जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध -11 जुलै
यादीवर विद्यार्थ्यांचे आक्षेप- 12 ते 14 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध -15 जुलै

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news