जेईई मेन : नागपूरचा कृष्णा राज्यात पहिला

जेईई मेन : नागपूरचा कृष्णा राज्यात पहिला
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा 'जेईई मेन्स'च्या पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सोमवारी (दि.11) जाहीर केला. या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल मिळाले असून, यात एका मुलीचा समावेश आहे. यातील सर्वाधिक उमेदवार हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आहेत. या परीक्षेत नागपुरातील कृष्णा अडवाई या विद्यार्थ्याला 99.99 पर्सेंटाईल मिळाले असून महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान त्याने पटकावला.

देशभरातील एकूण 8 लाख 72 हजार 432 विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स सत्र पहिले (बीई, बीटेक) च्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी 7 लाख 69 हजार 589 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 21 हजार 719 मुली, तर 5 लाख 47 हजार 867 मुले होती. यंदा 3 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली. जेईई मेन्स 2022 च्या दोन्ही सत्रानंतर आधीच जाहीर केलेल्या धोरणानुसार सत्र 1 आणि सत्र 2 पैकी सर्वोत्तम गुण विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या श्रेणी जाहीर केल्या जातील, असे एनटीएकडून जाहीर करण्यात आले आहे.

यंदा जेईई मेन्स 407 शहरांमधील 588 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती, ज्यात भारताबाहेरील 17 शहरांचा समावेश होता. मनामा, दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजाह, सिंगापूर, कुवेत सिटी, क्वालालंपूर, लागोस/अबुजा, कोलंबो, जकार्ता, व्हिएन्ना, मॉस्को, पोर्ट लुई आणि बँकॉक येथील परीक्षा केंद्रावर जेईई मेन्स परीक्षा पार पडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news